एखादा स्वयंप्रकाशित तारा आकाशात सदैव चमकत असतो आणि किती तरी प्रकाशवर्षे दूर असणार्या दुसर्या ग्रहांना तो जाणवतो. त्याप्रमाणे मला कुमारजी थोडेसे जाणवले आहेत, बस इतकंच!
एखाद्या कलाकाराच्या चाहत्यांमध्ये एवढं वैविध्य असण्यामागे विविध कारणं असतात. कुमारजींच्या बाबतीत ते कारण आहे, त्यांची सौंदर्यदृष्टी, असं मला वाटतं. त्याच सौंदर्यदृष्टीमुळे ते फक्त शास्त्रीय गायक न राहता ‘गंधर्व’, एक ‘तत्त्ववेत्ता’ आणि एक ‘तर्कविद्यानिपुण’ होतात. कोणताही सिद्धांत कसून तपासून पाहून मगच आत्मसात करण्याच्या मार्गाचे ते अनुसरण करतात, म्हणून ते ‘सिद्धांतकार’ होतात.......